बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडीओमागे आहे दर्दनाक कहाणी, तरीही लढतेय तरुणी

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला आहे. या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचं संकट असताना ऑक्सिजनची कमतरता, बेडची कमतरता यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

कोरोनाने मृत्युचं तांडव घालत असलं तरी काहीजण मोठ्या हिमतीने कोरोनाचा सामना करत आहेत. याबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशाच प्रकारे दिल्लीतील एका रुग्णालयात भरती असलेल्या 30 वर्षीय कोरोना रुग्ण तरूणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील मुलीवर गेल्या 10 दिवसांपासून उपचार चालू आहेत. मात्र तिची इच्छाशक्ती किती आहे, याबाबत डॉक्टरांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

कोविड इमरजेंसीमध्ये गंभीर स्थितीत उपचार सुरू झाले. गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. एनआयव्ही सहाय्य करत आहे, तिला रेमेडिसवीर देण्यात आला आहे आणि प्लाझ्मा थेरपी देखील केली आहे. मुलीची इच्छाशक्ती जोरदार आहे. आज तिनं मला गाणं वाजवण्यास सांगितलं. मी मान्य केले. कधीही हार मानू नका, असं रूग्णालयामधील इमरजेंसी फिजिशियन डॉक्टर मोनिका लेंगे यांनी सांगितलं.

दरम्यान, डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

सोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल!

कपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

मोठी बातमी! 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर

मुंबईत महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ

“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर पवारांना बारमालकांची काळजी, सामान्य माणसा तुच तुझा वाली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More