बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रपूरच्या तरुणीनं अनेकांना फोडलाय घाम, पहिल्यांदा द्यायची नयनसूख अन् त्यानंतर…

चंद्रपूर | देशात आणि राज्यात तरूणांना फसवल्याची अनेक फ्रॉड प्रकरणे (Chandrapur Fraud case) समोर येत आहेत. चिंतेची बाब म्हणजे अनेक तरूण-तरूणी या फ्रॉड प्रकरणाला बळी पडत आहेत. आता एका तरूणीने मोबाईल फोनचा वापर करत धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे.

एक तरूणी मुंबईत असल्याचं सांगून तरूणांना जाळ्यात ओढत होती. तरूणांना व्हिडिओ कॉल (Video Call) करून अश्लील चाळे करत तरूणांना घायाळ करायची. तसेच निर्वस्त्र होऊन तरूणांना 15-20 मिनिटं बोलायला भाग पाडायची. सुरूवातीला तरूणांना नयनसुख देऊन मोहात पाडणारी ही तरूणी नंतर सार सुखचं हिरावून घेत होती. तसेच धमक्या देत काही तरूणांच मानसिकरित्या खच्चीकरण तरूणीने केलं आहे.

चंद्रपूर परिसरात या घटनेमुळे एकचं खळबळ उडाली आहे. तरूणांनी अशा प्रकारच्या कुठल्याही फोन कॉल्सना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तरूणी व्हिडीओ कॉलवर चाळे करून  तो व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायची. रेकॉर्ड केलेल्या कॉलचा वापर तरूणांना ब्लॅकमेल करण्यासाठी करायची. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणांकडे पैशाची मागणीही करायची.

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे राजकीय नेतेही या तरूणीच्या कॉल्सना बळी पडल्याची माहिती आहे. आरोपी तरूणी पोलीस सहकारी असल्याचा दावा करत होती. तरूणीने अनेक तरूणांना फसवल्याची देखील माहिती आहे. आपली बदनामी होईल या भीतीपोटी अनेक तरूण पोलिसांकडे तक्रार दाखल करत नव्हते. त्यामुळे आता पोलीस देखील सतर्क राहण्याचं आवाहन करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“तुझं नशिब नाहीतर…”, गंभीरनं कॅप्टनवरच टीका केल्यानं क्रिकेट जगतात मोठी खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून 4 लाखांची वसुली, तिघांना पकडले

देवेंद्र फडणवीसांना पाहून काँग्रेसच्या आमदारानं काढला पळ, कारणही सांगितलं…

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

डीएसकेंना खरोखर आमदार चावला का?, आता नवीनच माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More