बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरुणीने सॅनिटायजर पिऊन कापली हाताची नस; नाशिकमध्ये एकच खळबळ

नाशिक | कोरोनाकाळात अनेक लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावत आहेत. कोरोनामुळे देशातील मृत्यूचं तांडव थांबत नसताना आता नाशिकमध्ये एका तरुणीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तरुणीने ज्या प्रकारे आत्महत्या केली त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

संबंधित घटना ही नाशिकमधील बिटको रुग्णालय परिसरात घडली आहे. तसेच संबंधित तरुणीचे नाव शिवानी लक्ष्मण भुजबळ असं आहे. शिवानी ही अवघ्या 20 वर्षांची आहे. शिवानी आपल्या आईला भेटण्यासाठी नाशिकला आली होती.

दरम्यान, रविवारी शिवानी नाशिकच्या बिटको रुग्णालयात आली होती. काही वेळानंतर रुग्णालयाच्या परिसरात तिने अर्धा लिटर सॅनिटायजर पिलं आणि त्यानंतर तिने आपल्या दोन्ही हाताच्या नस कापून घेतल्या.

दरम्यान, धारदार शस्त्राने नस कापून घेतल्यामुळे तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृती बिघडत असल्यामुळे नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यानच सोमवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस याचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप

केंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण

मराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, पण मृतांचा आकडा वाढला

‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चिनी रॉकेट्स कोसळून जगाचा नरक करणार’

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More