पुणे | राज ठाकरे यांनी अयोध्येत यावं अशी प्रभू रामाचीच इच्छा नाही, असं मत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केलं आहे.
माझं काय होणार, या चिंतेने राज ठाकरे त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच ते वेळोवेळी भूमिका बदलत आहेत. कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने बोलत ते नाटके करत आहेत, असं आझमी म्हणालेत.
उत्तर प्रदेशमध्ये राज यांच्याबद्दल द्वेष आहे. या द्वेषाला घाबरूनच त्यांनी अयोध्या दौरा रद्द केला आहे. उत्तर भारतीय नागरिक आपल्या सन्मानासाठी काहीही करू शकतात. त्यामुळे राज यांनी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी, असं ते म्हणाले.
कोणी भोंगे, कोणी मशिदी, कोणी मंदिरांबद्दल बोलत आहे. विकासावर मात्र कोणीच बोलत नाही. संविधानाच्या विरोधात धर्माला उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील सरकारकडून तर नवीन संविधान बनविण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशी टीका अबू आझमी यांनी केलीये.
थोडक्यात बातम्या-
“राज ठाकरेंवर उपचार करण्याची गरज, एखाद्या चांगल्या काऊन्सिलरकडे त्यांनी दाखवावं”
‘घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्रानं पाहिला’; दीपाली सय्यद यांची पुन्हा राज ठाकरेंवर टीका
“पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊदसोबत संबंध नाहीत ना?”
‘…म्हणून अयोध्या दौरा स्थगित केला’; राज ठाकरेंनी सांगितलं कारण
‘मी काय कांड करणार?, मला कांड करायचा असता तर…’; सभेआधी वसंत मोरे संतापले
Comments are closed.