Aadesh Bandekar | आज राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. देशासह राज्यातील मुंबई महानगरात लोकसभा निवडणूक सुरू आहे. अनेक लोकं उन्हामध्ये उभे राहत रांगा लावत मतदानाचा अधिकार बजावताना दिसत आहेत. मात्र मुंबई महानगराच्या काही भागांमध्ये उन्हाच्या झळा सोसत मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. तर मुंबईमध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद असल्याने काहींनी पुन्हा मत न देता घराकडे परतीच्या प्रवासाला सुरूवात केली आहे.
आदेश बांदेकरांचा ईव्हीएम मशीन बंद असण्यावरून संताप :
इन्स्टा लाईव्हमध्ये आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी ईव्हीएम बंद असण्यावरून संताप व्यक्त केला आहे. मी आता पोवईतील पोलिंग बुथवर आहे. हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर आहे. इकडे 57, 58 पोलिंग बुथवर याद्या बंद झाल्या आहेत. सगळ्या मशिनरी बंद झाल्या आहेत. तीन तीन तास प्रतिक्षा केल्यानंतर काहीजन घरी येत आहेत.
View this post on Instagram
दोन तास झाले आम्ही उन्हात थांबलो आहे आम्ही प्रतिक्षा करत आहोत. कोणी उत्तरच देत नाही. हिरानंदानी फाऊंडेशन येथे ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत, असा संताप बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी सोशल मीडियावर लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
बांदेकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
यावेळी बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या बेशिस्तपणामुळे गोंधळ झाला आहे. अनेक ठिकानी लोकांना मतदान करता आलं नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली पाहिजे. निवडणूक आयोगाला कोर्टात खेचलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने लिहिली आहे. (Aadesh Bandekar)
तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, हिच का लोकशाही? याला आता कोण जबाबदार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महानगरात वेगवेगळ्या मतदारसंघात ही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातही हिच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून ते शेवटच्या म्हणजेच आजच्या पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद होत असलेल्या घटना घडताना दिसत आहेत. हीच परिस्थिती आज मुंबई महानगराच्या पोलिंग बुथवर पाहायला मिळत आहे.
News Title – Aadesh Bandekar Share Video On Social Media Bout Evm Machine Switch Off
महत्त्वाच्या बातम्या
अक्षय कुमारने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क; म्हणाला आपला भारत नेहमीच….
“भाजप गरज संपल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत..”; शरद पवारांनी दिली धोक्याची घंटा
बारावीच्या निकालाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी लागणार निकाल
“जिच्यामुळे वाद झाले, तिला तिसराच..”; सलमान-विवेकच्या भांडणावर सलीम खान यांनी सोडलं मौन
MS धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनी अजून एक वर्ष..