महाराष्ट्र मुंबई

भाजप प्रवक्त्याने मराठी अभिनेत्रींबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर बांदेकर संतापले; म्हणाले…

मुंबई | भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मराठी अभिनेत्रींची खिल्ली उडवली होती. त्यामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच अभिनेते आदेश बांदेकर यांनीही अवधुत वाघ यांच्या वक्तव्यावर टीका करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मराठी अभिनेत्रींनी स्वकष्टातून घेतलेली स्कुटी आणि फर्स्ट क्लासचा पास हा आत्मसन्मान आहे. मानधन आणि आर्थिक परिस्थिती वरून केलेली थट्टा ही अत्यंत निंदनीय आहे. कुणा अमराठी अभिनेत्रीचा डंका पिटण्यासाठी मराठी अभिनेत्रींच्या आत्मसन्मानाचा अपमान अत्यंत दुर्दैवी, तीव्र निषेध, असं आदेश बांदेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

एका ट्विटर युजरच्या ट्विटला रिप्लाय देत भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी
स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात, असं म्हटलं होतं.

दरम्यान, एका ट्विटर युजरने कंगणा आणि मराठी अभिनेत्रींचं मानधन दिलं होतं. यामध्ये मराठी अभिनेत्री आणि कंगणाच्या मानधनामध्ये फार तफावत होता. त्या युजरनेही ट्विटमध्ये सुरूवातीला हेही सांगितलं होतं की, कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. सर्वांच्या माहितीसाठी.. कंगनाची फी-11 कोटी (मुव्हीसाठी)\ 1.5 कोटी (अॅडसाठी), मराठी नट्या- 2.5 ते 5 लाख (मुव्हीसाठी)\ 7.5 ते 10000 रुपये पर डे सीरियलसाठी असं ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या रुपात एक ओबीसी नेता संपवला”

“50 वर्षांत शरद पवारांनी मराठा आरक्षण का दिलं नाही?, आरक्षण देण्याची तुमची इच्छा कधीच नव्हती

‘बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वेला राहतात’; शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

“मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अनाकलनीय”

व्यंगचित्रावरुन आता शिरुरमध्येही राजकारण तापलं; शिवसेना-राष्ट्रवादीत स्टेटस वॉर सुरु!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या