11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश भाऊजींनी फटकारलं, म्हणाले..
मुंबई | झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘होम मिनिस्ट’र गेल्या 18 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या कार्यक्रमासोबतच याचे निवेदक व सर्वांचे लाडके आदेश भाऊजी देखील या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.
होम मिनिस्टरचं नवं पर्व टमहा मिनिस्टरट प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महा मिनिस्टर पर्वाच्या विजेतीला 11 लाखांची पैठणी मिळणार आहे. सध्या सगळीकडे 11 लाखांच्या पैठणीची चर्चा सुरू असून अनेक जण याला ट्रोल देखील करत आहेत. सोन्याची जर आणि हिरे जडलेल्या या 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना कार्यक्रमाचे निवेदक आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी फटकारलं आहे.
जे 11 लाखांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित हे माहिती नाही की ती मी देणार नाही. ती पैठणी प्रायोजकांकडून येते. झी मराठी वाहिनीने या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो, असं आदेश बांदेकर एका मुलाखतीत म्हणाले आहेत.
दरम्यान, या पैठणीची किंमत 11 लाख असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश असून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय, असं देखील आदेश बांदेकर म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ
जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
“सिल्वर ओकवरील हल्ला हा माझ्या आईवर झालेला हल्ला”
मोठी बातमी! मुंबई महापालिकेचा नारायण राणेंना झटका
Comments are closed.