Aadhaar Card l आधारकार्ड हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. मात्र आता आधारकार्ड संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आधारकार्ड अपडेटसाठी कागदपत्रं अपलोड करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आधारकार्डवरील नाव बदलण्यासाठी राजपत्र मात्र अनिवार्य करण्यात आले आहेत.
अपडेट करण्यासाठी ही सुवर्णसंधी असणार :
यापूर्वी आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम दिनांक 14 मार्च होती. मात्र त्यानंतर 14 जून 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. परंतु, ही अंतिम मुदत जवळ येताच त्यात पु्न्हा यामध्ये एकदा वाढ करण्यात आली आहे. तसेच 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती.
परंतु, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ही मुदत पुन्हा दोन वेळा वाढवली होती. मात्र आता ही तारीख 14 डिसेंबर अशी करण्यात आली आहे. तसेच आता नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध असणार आहे. तसेच जर तुमचे आधारकार्ड तब्बल 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर अपडेट करण्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
Aadhaar Card l आधारकार्ड अपडेट कसे करावे :
परंतु, आधारकार्ड अपडेट करण्यासाठी गॅझेट हे आवश्यक असणार आहे. तसेच याविषयी UIDAI ने हा नवा निर्णय घेतला आहे. यामध्ये नावातील बदलाविषयी कडक भूमिका देखील घेण्यात आली आहे. तसेच नावातील बदला आधारे मोठा घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेऊन राजपत्र आवश्यक करण्यात आले आहे. परंतु, आता आधारकार्डवरील नावात बदलासाठी राजपत्र सादर करावं लागणार आहे.
मात्र या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टलवर https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी अवघे 25 रुपये शुल्क अदा करावे लागणार आहे.
News Title – aadhaar Card Update deadline has been Extended
महत्वाच्या बातम्या-
मतमोजणीत झालायं मोठा घोळ; आव्हाडांनी सादर केली धक्कादायक आकडेवारी
फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली
… त्या गोष्टीसाठी भाजप शिंदे व अजित पवारांचा पक्ष फोडेल!
दिल्लीतून ‘तो’ निरोप आला अन् इकडे एकनाथ शिंदे रूसल्याच्या चर्चेला उधाण
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दिला राजीनामा