आधार जोडणीसाठी मोबाईल कंपन्यांचा फोन आला तर नाही म्हणा!

मुंबई | आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत जोडणीसाठी टेलिकॉम कंपन्यांचे फोन किंवा मेसेज सातत्याने येत असताता. आता अशाप्रकारे जोडणीसाठी आग्रह करणाऱ्या कंपन्यांना नाही म्हणून सांगा. 

सर्वोच्च न्यायालयाने आधार बाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणतीही खासगी संस्था नागरिकांना आधार कार्डची सक्ती करु शकत नाही, असं न्यायालयानं बजावलं आहे. 

न्यायालयाच्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांसोबतच शाळा आणि महाविद्यालये देखील आधार कार्डची सक्ती करु शकत नाहीत. त्यामुळे आता अशा संस्थांनी आधार मागण्याचा प्रयत्न केला तर नाही म्हणायला विसरु नका. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राफेल घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांकडून मोदींची पाठराखण!

-ती सांगत असलेल्या घटनेला बरीच वर्षे लोटल्यामुळे मला काहीच आठवत नाही!

मंत्रालय आत्महत्येचं आणि भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे- अजित पवार

-अडचणीच्या काळात भाजपला माझी आठवण येते!

-बँकांना कोट्यावधींचा चुना लावून पळून जाणारे सगळे गुजरातचेच कसे?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या