बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मलंग’ चित्रपटामुळे वाढली दिशा-आदित्यची लोकप्रियता

मुंबई | बॉलिवूडचा नवा अ‍ॅक्‍शन हिरो आदित्य रॉय कपूर आणि बॉलिवूडची सध्याची सर्वाधिक सेक्सी अ‍ॅक्टरेस दिशा पटानीची ‘मलंग’ केमिस्ट्री यंगस्टर्सना खूप पसंत पडलीय. ज्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत खूप फरक पडलेला दिसून येतोय. दोघांची वाढती लोकप्रियता पाहता, स्कोर ट्रेंड्स इंडिया न्यूजप्रिंट लीडरशीपमध्ये आदित्य आणि दिशाच्या रँकिंगमध्ये खूप फरक पडलेला आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. ह्या आकडेवारीनुसार, ‘मलंग’चा प्रोमो येण्याअगोदर, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानीची रँकिंग अनुक्रमे, 21 आणि 15 अशी होती. फिल्मचे फस्ट पोस्टर आणि प्रोमो आल्यानंतर एका आठवड्यातच ह्या दोघांच्या धमाकेदार केमिस्ट्रीविषयीच्या चर्चा रंगल्या. खास करून, युवा वर्गात ह्यांची लोकप्रियता एवढी वाढली की, दोघंही लोकप्रियतेची शिखरं पादाक्रांत करत गेले. आदित्य 21वरून 11 व्या क्रमांकावर पोहोचला तर दिशा 15 व्या क्रमांकावरून 5 व्या स्थानी (30 जानेवारी) पोहोचली.

चित्रपटाच्या रिलीजवेळी आणि रिलीजच्यानंतर आदित्य आणि दिशा दोघांविषयी देशभरातल्या सर्व न्यूज मीडियामध्ये बातम्या झळकल्या. 13 फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आदित्य 11व्या स्थानावरून पाचव्या स्थानी तर दिशा पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचलीय.

आदित्य आणि दिशा युवा वर्गात खूप लोकप्रिय आहेत. मलंग सिनेमामुळे तर दोघांच्याही लोकप्रियतेत चांगलाच फरक पडलेला दिसून आला. दोघांचीही सुडौल शरीरयष्टी युवावर्गाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. युवाई त्यांचे अनुकरण करतानाही दिसतेय. तसेच मलंग सिनेमावेळी आदित्य-दिशाविषयीची अनेक आर्टिकल्स वृत्तपत्रात छापून आली. त्यामुळेही ह्या दोघांच्या लोकप्रियतेत वाढ झाली, असं स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

धनंजय मुंडेंचं स्तुत्य पाऊल; रेल्वे ट्रॅकजवळ सापडलेल्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

पवारांनी मतदारांच्या प्रपंचात माती कालवली, 50 कोटी वाटून सत्ता मिळवली- रंजन तावरे

महत्वाच्या बातम्या-

ह.भ.प. इंदोरीकर महाराजांना दिलासा; सायबर सेलनं केला ‘हा’ मोठा खुलासा

“आता सुप्रिया ताईंना ‘सेल्फी विथ खड्डे’चा विसर पडला आहे का?”

अजित पवारांनी आपला ‘तो’ शब्द खरा करुन दाखवला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More