Top News महाराष्ट्र राजकारण

कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच आहे- आदित्य ठाकरे

मुंबई | मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग याठिकणी उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून विरोधी पक्षाने टीका केल्या होत्या. तर आता कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा सांगितलाय.

या जागेवर केंद्राने दावा केल्यानंतर आता कारशेड होणार की नाही हा मुद्दा उपस्थित होतो. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गची जागा ही राज्य सरकारचीच असल्याचं सांगितलं आहे.

कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राने दावा सांगतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपला मुंबईच्या विकासाच्या आड यायचं असल्याचा आरोप करण्यात येतोय.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय असं म्हटलंय. शिवाय केंद्र सरकार हळूहळू आणीबाणीच्या दिशेने देशाला नेत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

“कांजूरमार्ग कारशेडचं काम थांबवण्याचं भाजपचं कटकारस्थान आहे”

राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार करतंय- सुप्रिया सुळे

“घंटी वाजवली, फोनची लाईटही लावली मात्र मोदींनी…”

‘या’ कारणाने सूर्यकुमारला टीम इंडियात जागा नाही; रवी शास्त्रींनी सोडलं मौन

कंगणा राणावत आणि रंगोलीला मुंबई पोलिसांकडून समन्स; 10 नोव्हेंबरला हजर रहावं लागणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या