Top News महाराष्ट्र मुंबई

बांगड्या घालण्याच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

Loading...

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनादरम्यान आझाद मैदानातील भाषणावेळी शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील पण आम्ही नाही असं म्हणत त्यांनी टीका केली होती. यावर कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीसजी मी सहसा प्रत्युत्तर देत नाही. सर्वात शक्तीशाली महिलांनी बांगड्या परिधान केल्या आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही बांगड्याबाबतच्या वक्तव्याबाबत माफी मागावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Loading...

राजकारण चालूच राहील, पण ही मानसिकता बदलायला हवी. किमान माजी मुख्यमंत्र्यांकडून तरी अशी अपेक्षा नाही, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

दरम्यान, एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन फडणवीसांनी शिवसेनेला घेरलं होतं. कोणी वारिस लावारीस सारखं बोलत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

11 नाही तर 15 दिवसांत ठाकरे सरकार पडेल- रामदास आठवले

मराठा आंदोलक विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सभागृहात आक्रमक भूमिका मांडणार- फडणवीस

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या