बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझा निवडणूक लढण्याचा प्रश्न महत्वाचा नाही; दुष्काळ निवारणाचा प्रश्न महत्वाचा- आदित्य ठाकरे

सोलापुर |  माझा निवडणूक लढण्याचा प्रश्न महत्वाचा नाही तर महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ निवारणाचा प्रश्न महत्वाचा आहे, असं वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे आज सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चाऱ्या छावण्यांना भेटी देत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

विधानसभा निवडणूक लढवणार का? यावर मी आत्ताच बोलणार नाही. पण माझ्यासारखे अनेक शिवसेनेतले तरूण माझ्यापेक्षा जास्त काम करत आहेत. त्यांच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणे उभी राहिल, असं ते म्हणाले.

दरम्यान, दुष्काळ निवारणाच्या प्रश्नांवर तातडीने मी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-उज्जैनमध्ये ५ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार; छिन्नविछिन्न केला चेहरा

-प्रकाश आंबेडकरांचं निवडणूक आयोगाला आव्हान

-‘गब्बर इज बॅक’…! शिखर धवनची ऑस्ट्रेलियाविरूद्ध शतकी खेळी

-शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंनी भरला दम

-नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More