आदित्य बरोबरच; संजय राऊतांचा सत्तेतून बाहेर पडण्यास पाठिंबा!

नवी दिल्ली | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बरोबरच बोलले, या भावना यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडण्यात आल्या आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. ते दिल्लीत बोलत होते. 

शिवसेना सत्तेत वाटेकरी आहे, मात्र सरकार आमचे नाही. त्यामुळे संपूर्ण पक्षाची सत्तेत बाहेर पडण्याची भावना आहे, असंही संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, अहमदनगरमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.