“माझं नाव घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही, 32 वर्षांच्या तरुणाने सरकारला हलवून ठेवलं”

नागपूर | दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिलं.

विधानसभेत आज सत्ताधारी आमदारांनी ही मागणी लावून धरत आज सभागृहात अनेकदा गोंधळ घालत सभागृह तहकूब करण्यास भाग पाडलं.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे का, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली. अधिवेशनात सुरुवातीपासूनच या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला.

मी अडीच वर्षात असं  बघितलं नाही. सत्ताधारीच येऊन आंदोलन करतात. सभागृहाचं कामकाज लहानपणापासून बघत आलोय, असा गोंधळ कधी पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

आम्ही राज्यपाल हटाव ही मागणी सतत करत आहोत. या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन करत आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना वाचवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More