“या बंडखोरीची कूणकूण मुख्यमंत्र्यांना 8 दिवस आधीच लागली होती”
मुंबई | राज्यात सुरु असलेलं राजकारण आणि नाट्यमय घडामोडी काही केल्या शांत होण्याच्या मार्गावर नाही. गेले 4 दिवस राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ सुरु असून कोणाचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. बंडखोर आणि नाराज आमदार शिंदे गट सोडायला तयार नाहीत तर शिंदे पक्षप्रमुखांचे ऐकत नाहीत. विरोधी पक्षांनी शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत टिका करण्याची संधी साधून घेतली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवूनही शिंदे गट अजून कोणत्याही निर्णयावर आला नाही.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर आता भाष्य केलं आहे. आदित्य म्हणाले, गुवाहाटीला जे आमदार आहेत त्यातील 50% आमदार आजही आपल्यासोबत असून त्यातील काही जणांना जेवणासाठी म्हणून घेऊन गेले आणि कैदी करुन ठेवले. मुख्यमंत्र्यांना ह्या बंडखोरीची कूणकूण 8 दिवसांपुर्वी लागली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करण्याची देखील तयारी दाखवली.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, हिंमत असेल तर महाराष्ट्रात राहून सांगायचं ना, सुरत किंवा आसामला जाऊन कसले बंड करता. मी दोन बंड पाहिलीत. ज्यांनी शिवसेना सोडली ते निवडणूकीत पडले. अशा प्रकारचं बंड विरोधी पक्षातून सत्तेत जाण्यासाठी असतात. पण शिंदे गटाचे हे बंड सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे. पंरतु आपल्यासोबत खरी शिवसेना आहे. पुढील सर्व लढाया ह्या जिंकण्यासाठी लढायच्या आहेत.
शिंदे गटातील आमदारांना भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करायचं असेल तर शिवसेना सोडावी लागणार का? शिंदे गट घरवापसी करणार का? महाराष्ट्रातील हा सत्तासंघर्ष आणखी किती दिवस चालणार हे येणाऱ्या काळालाच ठाऊक.
थोडक्यात बातम्या –
“बेताल वक्तव्य करणारे कोण हे सर्वांनाच माहिती, इथे धमकीला कोणी घाबरत नाही”
उद्धव ठाकरेंना काळजी नाही कारण त्यांना माहितीये ‘त्यावेळी’ इंदिरा गांधी अजिंक्य राहिल्या!
‘तुम्ही फक्त सतरंज्या झटका’, महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर इंदुरीकर महाराज स्पष्टच बोलले
शिवसेनेला आणखी एक झटका, ‘या’ बड्या नेत्यावर ईडीची कारवाई
‘हा भाजपचा डाव’, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर मुख्यमंत्र्यांची संतप्त प्रतिक्रिया
Comments are closed.