Top News महाराष्ट्र मुंबई

…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे

मुंबई | दिल्लीत झालेल्या शेतकरी आणि पोलिसांच्या चकमकीने प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागलं. गेले 60 दिवस शांतपणे आंदोलन करणारे शेतकरी इतके आक्रमक झाले केस?, असा सवाल केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत माध्यामांशी संवाद साधताना एक शंका उपस्थित केली आहे.

केंद्र सरकारला देशात अराजकता आणायची आहे का? त्यासाठी देशात सतत आंदोलनं सुरु ठेवायची आणि काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार तर केंद्र सरकार करत नाही ना?, अशी शंका आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली आहे.

गेल्या दोन महिन्यांमध्ये काय झालं? शेतकऱ्यांशी चर्चा कोण करणार? हे आंदोलन कोणी चिघळवण्याचा प्रयत्न केला का?, या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, सत्य बाहेर येणं गरजेचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जे शेतकरी अन्नदाता आहेत, त्यांचा संयम सुटला. तो का सुटला, या सगळ्यामागे कोणीतरी वेगळेच होतं का?, या सगळ्याचा विचार होणं गरजेचं असल्याचंही ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

दिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; समोर आला धक्कादायक व्हिडीओ

शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या