Top News महाराष्ट्र मुंबई

…तर सरकारचे 5500 कोटी वाचतील आणि 1 कोटी लोकांना फायदा होईल- आदित्य ठाकरे

मुंबई | मुंबई उच्च न्यायालायने कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचा आदेश दिले आहेत. ठाकरे सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. अशातच या निर्णयावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही कोर्टाच्या आदेशाची लिखित सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो 2 सोबतच 6, 4 आणि 14 साठी ही जमीन महत्वाची आहे. यामुळे सरकारचे पाच हजार 500 कोटी रुपये वाचत आहेत. 1 कोटी लोकांना याचा फायदा होणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होतं. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला.

दरम्यान, मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील सहकारी, अधिकाऱी, कायदा विभाग, अॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतील. कायदा आणि नियमाला धरुन जी सकारात्मक भूमिका असेल ती आम्ही घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या