Top News महाराष्ट्र रत्नागिरी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे म्हणाले…

रत्नागिरी | मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरूणीने पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. पूजा चव्हाणच्या आत्महत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी महाविकास आघाडी सरकारमधील शिवेसेनेचा नेता असलेल्या मंत्र्याचं नाव जोडलं जात आहे. यावरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच या प्रकरणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मला याबाबत अद्याप माहिती नाही, पुर्णपणे माहिती घेऊन यावर बोलेन, अशी सावध प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप्स सोशल माध्यामांवर व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मंत्री संजय राठोड हेच पुजा चव्हाण यांच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर बोलताना सावध भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलतील असं म्हटलं होतं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात पत्र लिहित सखोल चौकशीची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील

“…तर मग आम्हाला आमदार राम कदम यांच्यापर्यंत जावं लागेल”

‘या’ प्रसिद्ध मॉडेलची निघृण हत्या, मृतदेहासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

पूजा चव्हाण प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं अजब वक्तव्य, म्हणाले…

‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या