Top News

आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई |  शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. दोघांच्या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांची पुन्हा भेट झाली आहे.

आदित्य ठाकरे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.

सत्तास्थापनेनंतर राहुल-आदित्य यांची भेट झाली. त्यामुळे या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, या भेटीत आदित्य राहुल यांना तिळगुळ देऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल माहिती दिल्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

अजित दादा, मी सदैव आपला आभारी राहीन- रितेश देशमुख

मोदींशी तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मानच; भाजपच्या माजी आमदाराचं वक्तव्य

मी नाराज नाही, काहीजण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत- एकनाथ शिंदे

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या