बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघात ‘आदित्य ठाकरे’

मुंबई | यंदाच्या वर्षीची ‘आयपीएल’ म्हणजे 13 वा हंगाम यूएईमध्ये खेळवले जाणार आहे. आयपीएलमध्ये कोणता संघ बाजी मारणार हे पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागलीये. यासाठी सर्वच टीम्स नेटाने सराव करतायत. तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा आहे. बीसीसीआयने ‘आयपीएल’साठी किती खेळाडूंना यूएईला न्यायचं यावर बंधन घातलेलंय. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.

Under-19 Cricket World Cup: Pacer Aditya Thakre off to New Zealand ...

आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. 2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली होती. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलीये. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या टीममध्ये लागल्याचं बोललं जातं.

फलंदाजांना सराव देण्यासाठीच आदित्यला आरसीबी संघाबरोबर यूएईला नेण्याचा निर्णय तूर्तास झाला आहे. त्यामुळे यंदा आदित्यला आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून कर्डीले-विखे पाटील एकत्र; घेतली कृषिमंत्र्यांची भेट

गुगलने विद्यार्थ्यांसाठी लाँच केलं ‘हे’ खास अ‌ॅप

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने राबवली ‘ही’ मोहिम

“एफआयआरने काही होणार नाही संजय राऊत यांना तुरुंगात टाका”

शरद पवारांची पार्थ पवारांवर टीका; फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More