बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

मुंबई | युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यावर टाकलेली राजकीय जबाबदारी ते समर्थपणे पेलत असल्याचंही अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. मात्र आता उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हेदेखील राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. येत्या दसऱ्या मेळाव्यालाच ते युवासेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

आदित्य ठाकरे यांनी राजकारणात आपला पाय रोवला असून त्यांना सामान्य जनतेकडूनही पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषत: तरूणांकडून त्यांना अधिक पसंत केलं जात आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरूण सरदेसाई यांनीही राजकारणात आपली छबी उमटवली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांचे धाकटे भाऊ तेजस हे राजकारणात कधी सक्रिय होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मात्र, आता या दसऱ्या मेळाव्याला तेजस ठाकरे युवासेनेत सक्रिय होणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षात येण्याने पक्षाला अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. अनेकवेळा शिवसैनिकांकडून तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार? ते युवासेनेत प्रवेश कधी करणार? असे प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे आता लवकरच शिवसैनिकांच्या या प्रश्नांना उत्तर मिळणार, असं दिसून येतंय.

तेजस ठाकरे हे नेहमी राजकारणात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष ठेवून असतात. त्याबद्दल मत व्यक्त करताना दिसतात. मात्र त्यांना स्वत: राजकारणात येण्यात रस नसल्याचं त्यांनी एकदा सांगितलं होतं. त्यामुळे या दसऱ्या मेळाव्याला ते युवासेनेत प्रवेश करून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार का? हे पाहावं लागणार आहे. याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला विचारले असता, त्यांनी तेजस ठाकरे लवकरच पक्ष प्रवेश करतील, अशी माहिती दिली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“एनसीबीची आणखी एक पोलखोल”; नवाब मलिक आज घेणार पत्रकार परिषद

“पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात”

महाराष्ट्र पोलिसांचा विदेशात डंका! एपीआय सुभाष पुजारींनी पटकावलं कांस्य पदक

कोरबो लोरबो जितबो रे! रोमांचक विजयासह कोलकाताची फायनलमध्ये एन्ट्री

“भाजपमध्ये गेल्यापासून मला शांतपणे झोप लागते, कसलीही चौकशी नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More