‘आडतास’ला शांता शेळके प्रतिष्ठानचा साहित्य गौरव पुरस्कार (उत्तेजनार्थ) प्रदान

पुणे | साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे कवयित्री शांता शेळके प्रतिष्ठानचे (मंचर) २०१७ वर्षासाठीचे साहित्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये श्री. गोपाळ गुंड यांच्या ‘आडतास’ या व्यक्तिचित्रसंग्रहाला उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रविवारी सकाळी ११ वाजता मंचर येथील विघ्नहर मंगल कार्यालयात हा साहित्य गौरव सोहळा पार पडला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र साहित्य परिषद, मंचरचे संस्थापक अॅड. बाळासाहेब बाणखेले, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांता शेळके प्रतिष्ठानचे दत्ताजी पायमोडे यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अभिनेत्री मेघा धाडे पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात  

‘रक्ताळलेले’ अच्छे दिन; शिवसेनेचं भाजपवर जोरदार टीकास्त्र

-नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

-त्या ‘सेल्फी’ साठी मी कोणाचीही माफी मागण्यास तयार- अमृता फडणवीस

-सेल्फी वादावर अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण; वाचा काय म्हणाल्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या