मुंबई | मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण पहायला मिळत होते, मात्र आता विदर्भात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रशासनासमोर कोरोनाला रोखण्याचं मोठं आव्हान आहे.
विदर्भात शनिवारी सलग चौथ्या दिवशी हजार पेक्षा जास्त कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने बऱ्या होणाऱ्या रुग्णसंख्येत संख्येत घट झाली आहे. रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या खाली आला असून कोरोनाचा हा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.
विदर्भात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव नागपूरमध्ये पहायला मिळतोय, गेल्या पाच दिवसांपासून इथं रोज 400 पेक्षा जास्त नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होत आहे. तर एकट्या अमरावतीत गेल्या चौदा दिवसात 3154 नव्या कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसातील आकडेवारी सर्वात धक्कादायक असून 10 फेब्रुवारीला 315 , 11 फेब्रुवारीला 359, 12 फेब्रुवारीला 369 , 13 फेब्रुवारीला 376 आणि 14 फेब्रुवारीला 399 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
अमरावती नागपूरसोबत यवतमाळ, अकोला, बुलडाणा या भागातही कोरोना आपले पाय पसरताना दिसत आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा इथं कोरोनाची प्रकरणं कमी झाल्याचं दिसत होतं, मात्र रविवारी वाढलेल्या आकडेवारीनं इथंही अजून कोरोनाचा प्रभाव असल्याचं जाणवतं.
थोडक्यात बातम्या-
मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ
‘कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप’; खासदार नुसरत जहाँचा भाजपवर निशाणा
‘पदावर बसणाऱ्यांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर…’; रक्षा खडसे आक्रमक
“स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी राजकीय स्वार्थासाठी नवा शोध लावला”
“…पण जयंतरावांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही”
Comments are closed.