पुणे | आघाडी – बिघाडी या फेसबुक पेजवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर आक्षेपार्ह टीका केली जात आहे, असा आरोप करत हे फेसबुक पेज तात्काळ बंद झालं पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या उपस्थितीत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, राष्ट्रवादी युवकने याआधीही आघाडी-बिघाडी हे फेसबुक पेज बंद करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
महत्वाच्या बातम्या-
-चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही… मात्र चूक नसेल तर भोगावं लागेल- देवेंद्र फडणवीस
-वादग्रस्त ट्वीटनंतर शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी
-“भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर; माझा नवरा घाबरणारा नाही”
-राज ठाकरे ईडी-बीडीला भीक घालत नाहीत… आमचा त्यांना पाठिंबा- राष्ट्रवादी
-“भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही”
Comments are closed.