बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

मुंबई | स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते? मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहे. मालिकेप्रमाणेच चाहते त्यातील कलाकारांवरही भरभरून प्रेम करत आहेत. आई कुठे काय करते? मालिकेतील एका अभिनेत्रीवर चाहते सध्या कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी अवयवदानाचा निर्णय घेतला आहेे.

आई कुठे काय करते मालिकेत विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगळेनं नुकताच तिचा 40वा वाढदिवस साजरा केला होता. यादिवशी तिने स्वत:लाच खास भेट देत अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. सीमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. सीमाच्या या निर्णयाचं चाहते भरभरून कौतुक करत आहेत.

मी अवयवदान केलं आहे. माझ्याकडून मलाच वाढदिवसाचं गिफ्ट. मला 40व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन लिहित सीमाने अवयवदान केल्याचं सांगितलं आहे. सीमाच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आणि तिच्या निर्णयाचं कौतुकही केलं आहे. सीमाच्या कामासोबतच आता तिच्या या निर्णयाचंही कौतुक होत आहे.

सीमा आई कुठे काय करते? या मालिकेत विमल हे पात्र साकारते. थोडीशी कोकणी भाषा असलेल्या विमल या पात्रालाही चाहत्यांची भरपूर पसंती आहे. ही मालिका टीआरपी रेसमध्ये देखील पुढे आहे. रंजक वळणावर आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Anant Ghogale (@seemaghogale)

 

थोडक्यात बातम्या-

मुकेश अंबानींची ‘या’ परदेशी कंपनीत मोठी गुंतवणूक; भारतीय उद्योगक्षेत्राला होणार फायदा

“फडणवीस मुख्यमंत्री असताना खुट्ट झालं तरी बोंबाबोंब व्हायची”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंचा पुन्हा आक्रमक पवित्रा

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More