“गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार बनणार”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | गुजरातमध्ये मतमोजणी सुरू झाली आहे. सध्या गुजरातमध्ये भाजप(BJP) आघाडीवर असल्याचं दिसत आहे. गुजरातमध्ये 182 जागांपैकी 150 जागा भाजपनं काबीज केल्या आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे.

भाजपचा गुजरातमधील विजय लक्षात घेता सध्या आम आदमी पक्षाचे (AAP)प्रमुख अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांच्या एका वक्तव्याची चर्चा होत आहे. केजरीवाल म्हणाले होते की, यावेळी गुजरातमध्ये आम आदमी पार्टी पक्षाचे सरकार बनणार आहे. त्यामुळं सत्तावीस वर्षानंतर गुजरातला भाजपपासून मुक्तता मिळणार आहे.

केजरीवाल असंही म्हणाले होते की, लिहून घ्या, गुजरातमध्ये यावेळी आपचेच सरकार येईल. गुजरातचा मुख्यमंत्रीही आमचाच असेल. परंतु गुजरातची सध्याची मतमोजणी लक्षात घेता भाजप विजयी होईल,अशी शक्यता आहे. त्यामुळं केजरीवाल यांचं भाकीत खोटं ठरेल अशा चर्चा आहेत.

सध्या गुजरतामध्ये आपने 8 जागांवर विजय मिळवला आहे. तर काॅंग्रेसनं(Congress) 20 जागांवर विजय मिळवला आहे. तर इतर पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे.

त्यामुळं केजरीवालांनी केलेली भविष्यवाणी खोटी ठरल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. तर केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केलेला रेकाॅर्ड ब्रेक विजयाचा दावा खरा ठरत असल्याचं चिन्ह दिसत आहे.

सध्या हिमाचल प्रदेशात भाजप-काॅंग्रेसमध्ये मोठी टक्कर सुरू आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशाच्या निकालाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-