Top News महाराष्ट्र मुंबई

…तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल- संजय राऊत

मुंबई | मुंबई मेट्रो-3 प्रकल्पासाठी कांजूरमार्ग येथील 102 एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का, की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू?, अशी विचारणा न्यायलयाने सरकारला केली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेलया सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे.

मेट्रो रेल्वे प्रकल्पात कुणी मिठाचा खडा टाकणार असेल, तर त्याचा गांभीर्याने विचार कराण्याची वेळ आली आहे. केंद्राचे कुणी उपटसुंभ बाप अचानक उपटले आणि कांजूरच्या जमिनीचा मालक असल्याचे बोलू लागले, तर महाराष्ट्रालाही तुमच्या बोलवत्या बापाचा शोध घ्यावा लागेल, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान,बुलेट ट्रेनला मागे टाकून कांजूरमार्गची मेट्रो कारशेड पुढे जाईल, राजकीय मिठाचा सत्याग्रह ही कारशेड रोखू शकणार नाही, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आलेला आहे.

थोडक्यात बातम्या-

मी ऊसतोड कामगाराचाच मुलगा, ऊसतोड कामगारांना विशेष सहाय्य मिळवून देणार- धनंजय मुंडे

आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुणे पोलिसांकडून अटक; पाहा काय आहे प्रकरण…

आणखी स्वस्त झाली कोरोना चाचणी; जाणून घ्या काय आहेत नवीन दर!

भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचं श्रेय पंतप्रधान मोदींना जात- मुकेश अंबानी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या