औरंगाबाद | महाराष्ट्र बंद वेळी औरंगाबादमध्ये रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यात सहभागी झालेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना आंदोलनकर्त्यांनी हुसकावून लावलं.
अंबादास दानवे आंदोलनात सहभागी असताना काही आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. मुख्यमंत्री मुर्दाबाद, शिवसेना मुर्दाबाद अशा घोषणांमुळे चिडलेले अंबादास दानवे एका मोर्चेकऱ्यावरच धावून गेले.
दरम्यान, त्यांच्या या कृतीमुळे आंदोलकांनी आक्रमक होत त्यांना मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना तेथून बाजूला काढलं.
महत्त्वाच्या बातम्या–
-फडणवीस यांच्या विरोधात वैयक्तीक घोषणा नको; अजित पवारांची मोर्चेकऱ्यांना ताकीद
-मराठ्यांना दंड आकारा; उच्च न्यायालयात याचिका दाखल
-आता कामकाज पाहण्यासाठी आदित्य ठाकरे संसदेत…
औरंगाबादमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; रस्त्यावर पेटवले टायर
-…म्हणुन सनी लिओनी मागतेय आर्थिक मदत