आमिर खान तिसरं लग्न करण्याच्या तयारीत?, स्वतःच केला मोठा खुलासा

Aamir Khan | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान हा त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही नेहमीच चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याची लेक आयरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत विवाह झाला. आयराच्या लग्नात आमिरचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होतं. आयरा खान ही आमिर (Aamir Khan) आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे.

आयराच्या लग्नात आमिरची दुसरी पत्नी किरण राव देखील मुलगा आझाद सोबत प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित होती. तिने लग्नात आयराच्या आईची सर्व भूमिका निभावली. आमिरचं पहिलं लग्न हे 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं.मात्र, दोघांचा संसार जास्त काळ टिकला नाही. 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

आमिर खान तिसरं लग्न करणार?

त्यानंतर आमिर खानने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. किरण आणि आमिर यांना आझाद नावाचा मुलगा देखील आहे. किरणने सरोगसीच्या माध्यमातून मुलाचं स्वागत केलं. मात्र, किरण आणि आमिर यांचाही संसार जास्त काळ टिकला नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली.

अशात आमिर खान हा तिसरं लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आमिरने स्वतः एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. त्याने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या शोमध्ये आमिर याने तिसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलंय. त्यामुळे सध्या फक्त आमिर खान (Aamir Khan) याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

तिसऱ्या लग्नाबाबत काय म्हणाला Aamir Khan?

मुलाखतीमध्ये आमिरला तिसरं लग्न करणार का?, असा सवाल करण्यात आला. यावर तो म्हणाला की, “सध्या मी 59 वर्षांचा आहे. मला नाही वाटत की मी आता तिसरं लग्न करेल. सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात अनेक नाती आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या जवळ आलो आहे. माझं कुटुंब आहे. त्यांच्यासोबत मी फार आनंदी आहे. एक उत्तम व्यक्ती होण्याचा आता मी प्रयत्न करत आहे.”, असं आमिर खान म्हणाला आहे.

दरम्यान, अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, तो सध्या 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ सिनेमाच्या सिक्वलमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेत्री जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सध्या ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

News Title – Aamir Khan on his third marriage

महत्त्वाच्या बातम्या-

आज कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

पुणेकरांनो सतर्क राहा! आज अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला! नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या डोक्याला ताप, महायुतीच्या 2 आजी-माजी आमदारांमध्ये कलह

युवकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सिनेमातून भाष्य, श्रीयुत नॅान महाराष्ट्रीयन प्रेक्षकांच्या भेटीला