Top News मनोरंजन

‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही- आमिर खान

मुंबई | बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खान एका सिनेमाची आतुरतेने वाट पाहतोय. अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या सिनेमाचा ट्रेलर आमिरने पाहिला असून हा सिनेमा पाहण्यासाठी तो उत्सुक असल्याचं आमिरने सांगितलंय.

आमिर खान म्हणाला, “प्रिय अक्षय कुमार, मी लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि तो मला फार आवडलाय. आता मी हा चित्रपट पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीये.”

हा चित्रपट थेटरमध्ये प्रदर्शित झाला असता तर वेगळीच मजा आली असती, असंही आमिरने सांगितलंय. तसंच अक्षयला त्याच्या या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

राज्यातील या भागात हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा!

बनावट ओळखपत्राने लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई’; ‘इतक्या’ लाखांचा दंड केला वसूल

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीतून आणावं अन्यथा…; मनसेचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या