Top News मनोरंजन

….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!

मुंबई | बॅालिवुड अभिनेता आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. आमिर खानने हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत एक अनोखा निर्णय घेतला आहे. ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत स्वत:चा मोबाईल बंद करण्याचा निर्णय आमिर खानने घेतला आहे.

आमिर खान त्याच्या प्रत्येक भुमिकेशी समरस असतो. त्यामुळे तो सिनेसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणुन ओळखला जातो. तसंच आत्ताही आमिर खानने त्याच्या ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटासाठी स्वत:चा मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल कामात अडथळा आणत असल्यामुळे आमिरने मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिर खानचा ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात आमिर खान सोबत अभिनेत्री करिना कपूर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे.

दरम्यान, ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट हॅालिवूडचा ‘फॅारेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक असुन हा चित्रपच टॅाम हँक्सचा फॅारेस्ट गम्पपासून प्रेरित होत बनवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”

“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”

“मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सुखदुःखात शेतकर्‍यांच्या पाठीशी ठाम ऊभे राहिले”

“कुठलाही संकल्प नसेल तर त्याला अर्थसंकल्प तरी कसं म्हणायचं?”

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या