Top News देश राजकारण

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलं यश न मिळाल्याने त्यांच्यावर अनेक टीका करण्यात येतायत. यातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही काँग्रेसवर निशाणा साधलाय.

एका कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, सध्या काँग्रेसचा कुणीही माय-बाप उरला नाहीये. त्यामुळे काँग्रेस देशाला भविष्य देऊ शकत नाही.”

केजरीवाल पुढे म्हणाले, “सध्याच्या स्थितीत कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतंय. जनतेने काँग्रेस किंवा भाजप यापैकी कुणालाही मत दिलं तरी सरकार भाजपचंच बनतं. कारण काँग्रेसचे आमदार नंतर वेगळे होऊन भाजपमध्ये जातात.”

दरम्यान आम आदमी पार्टीविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले, “आमची भूमिका कशी असेल हे वेळच ठरवेल. आप एक छोटा पक्ष असून आमचा फारसा विस्तार नाहीये. मात्र देशातील लोक नक्कीच पर्याय देतील याची मला आशा आहे.”

महत्वाच्या बातम्या-

विविध‌ योजनेअंतर्गत 5 लाख घरकुलांना मंजुरी देणार; हसन मुश्रीफांची घोषणा

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या