नवी दिल्ली | नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांवरुन ईशान्य दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. हिंसाचारात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आमआदमी पक्षाचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका मोठ्या ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. विशेष म्हणजे गुप्तचर विभागाचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येसाठी त्यांच्या कुटुंबाने या घरातील व्यक्तींनाच जबाबदार धरले आहे.
यापूर्वी याच घराचा एक व्हिडीओ समोर आला होता. यात या घरावरुन पेट्रोल बाॅम्ब आणि दगडं फेकले जात होते. त्यामुळे दिल्लीत हिंसाचार भडकवण्यामध्ये ताहिर हुसैन यांचा हात आहे, अशी शंका घेण्यास जागा आहे.
दरम्यान, ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून मी निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपने या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘भाजप नेत्यांवर अजून FIR का दाखल झाला नाही?’ असं सुनावणाऱ्या न्यायमूर्तींची बदली!
ठाकरे सरकारचा भाजपला पुन्हा धक्का; भाजपच्या बड्या नेत्याची नियुक्ती रद्द
महत्वाच्या बातम्या-
‘सोशल मीडिया’त मराठीच्या वापरात हजार टक्क्यांनी वाढ
“अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती”
बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!
Comments are closed.