बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ

नवी दिल्ली | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळपासूनच या राज्यातील निकाल हाती यायाला सुरूवात झाली. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने (AAP) पंजाबमध्ये (Punjab) सर्वात मोठी आघाडी घेतली आहे.

पंजाब विधानसभेच्या एकुण 117 जागा आहेत. यामध्ये आपने तब्बल 89 जागांवर आघाडी घेतली. तर काँग्रेसला केवळ 12 जागांवर आघाडी घेण्यात यश आलं आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, आपने आघाडी घेतली आणि पंजाबमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ केला.

2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती तर आपला 20 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पंजाबच्या मतदारांनी आम आदमी पक्षाला कौल दिला आहे. तर शेतकरी आंदोलनाचा थेट फटका भाजपला बसल्याने पंजाबमध्ये भाजप निष्प्रभ दिसून येत आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. आम आदमी पक्षाच्या आघाडीनंतर काँग्रेसने त्यांचा पराभव स्विकारला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी राज्यपालांकडे त्यांच्या राजीनामा देणार असल्याचं समोर येत आहे. (Punjab Assembly Election Result 2022)

थोडक्यात बातम्या-

“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”

“पदरात काहीच नाही, तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच”

सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव

महाराष्ट्राच्या बाहेर शिवेसनेच्या ‘फ्लाॅप शो’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More