10 जणांकडून बलात्कार करुन घेणाऱ्या भाजप नेत्याला 10 लाख; आप नेत्याची जीभ घसरली

नवी दिल्ली | हरयाणातील रेवाडी बलात्कार प्रकरणी टीका करताना आप नेत्याची जीभ घसरली आहे. भाजप नेत्यांनी 10 जणांकडून स्वतःवर बलात्कार करून घेतल्यास आपण त्या नेत्याला 10 लाख रुपयांची मदत करू, असं हरयाणातील आम आदमी पक्षाचे नेते नवीन जयहिंद यांनी म्हटलंय.

रेवाडी बलात्कार प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारने 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आप नेते नवीन जयहिंद यांनी ही मदत कमी असल्याचे सांगताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

स्वतःवर एखाद्या भाजप नेत्याने बलात्कार करून घेतल्यास त्याला आपण 10 लाख रुपयांची मदत देऊ, त्यांना मगच बलात्कार पीडित मुलीचे दुःख कळेल. तुम्ही मुलीच्या अब्रूची किंमत फक्त 2 लाख कशी ठरवू शकता, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जेएनयूमधील काही शक्ती भारताविरूद्ध युद्ध पुकारत आहेत- निर्मला सितारामन

-मनसेची सत्ता आली तर राज ठाकरे नव्हे या नेत्याला व्हायचंय मुख्यमंत्री!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोडणार मनोहर पंतांचा ‘हा’ विक्रम

-राधाकृष्ण विखे-पाटलांचे पुत्र सुजय विखे राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढणार?

-नदीच्या वाहत्या पाण्यातच गणेश मुर्तींचं विसर्जन करा; सनातनचा हेकेखोरपणा