नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका (Assembly Election) पार पडल्या. पाच राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता या राज्यांतून एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे.
पोलस्ट्रेट आणि टीव्ही 9 ने केलेल्या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) आम आदमी पार्टी किंग मेकर ठरू शकते. उत्तराखंडमध्ये 70 विधानसभा जागा आहेत. ज्या पक्षाला 36 जागा मिळतील तो पक्ष उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापन करेल. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी आप किंग मेकरची भूमिका बजावू शकतो.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, उत्तराखंडमध्ये काँग्रेसला 33-35 जागा, भाजपला 31-33 जागा, आम आदमी पक्षाला 0-3 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात. ही आकडेवारी पाहिली तर कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. त्यामुळे उत्तराखंडमध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर आपचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, निकालानंतरही हीच आकडेवारी राहिली तर उत्तराखंडमध्ये चुरस पाहायला मिळु शकते. त्यामुळे आम आदमी पक्ष (AAP) कोणाला पाठिंबा देणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 10 मार्च रोजी पाचही राज्यांतील निकाल जाहीर होणार आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘…तरच युद्ध थांबेल’; रशियाच्या या नव्या चार अटींनी युक्रेनचं टेंशन वाढलं
“मी म्हातारा होईपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री होत नाहीत”
पुढील 3 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी
‘त्या’ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?, नाना पटोलेंचा सरकारला सवाल
फडणवीस बोलत असताना भर अधिवेशनात गिरीश महाजनांना लागली डुलकी अन्…, पाहा व्हिडीओ
Comments are closed.