नवी दिल्ली | आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकीत खातं उघडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील दापक्याळ ग्रामपंचायतीत ‘आप’चे सात पैकी पाच उमेदवार निवडून आले आहेत.
लातूर जिल्ह्याचे आपचे जिल्ह्याध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात ‘आप’ने दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांवर ताबा मिळवत ही ग्रामपंचायत खेचून आणली आहे.
आपचे अजिंक्य शिंदे यांनी या विजयासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. त्याला रीट्विट करत केजरीवालांनी मराठीत ट्वीट करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे.
विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी मराठीत विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा, असं केजरीवाल म्हणाले.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
थोडक्यात बातम्या-
कंगणा राणावत पुन्हा चर्चेत; काय आहे या फोटोचं रहस्य???
25 वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या एसटी चालकांना मिळणार ‘इतक्या’ हजारांचं बक्षीस- अनिल परब
“उद्धव ठाकरे यांनी कधीच बाहुबलीचं राजकारण केलं नाही”
उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण…- देवेंद्र फडणवीस
“ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन”