मनोरंजन

‘आर्ची’ लहानपणी अशी दिसायची; शेअर केला फोटो

Rinku Rajguru

मुंबई | ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु तरुणाईमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर  अकाउंट काढले आहे. ज्यावर ती आपले फोट शेअर करत असते. रिंकू आपल्या अकाउंटवर लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे.

रिंकूने शेअर केलेल्या या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंत केलं जात आहे. विशेष म्हणजे या फोटोत तिचे आई-वडिलही दिसत आहे. शिक्षक दिनानिमित्त हा फोटो शेअर करुन रिंकूने आपल्या आई-वडिलांना वंदन केलं आहे.

रिंकू सोशल मीडियावर खूप अ‌ॅक्टीव झाली आहे. तिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर अकाउंट काढलं होतं. थोड्याच दिवसात तिचे अकाउंट 78.8K जणांनी लाईक केलं आहे. रिंकू यावर तिचे अनेक फोटो नियमित पणे टाकत असते.

दरम्यान, सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेमुळे रिंकू राजगुरु एका दिवसात स्टार झाली होती. विशेष म्हणजे रिंकूचे चाहते तिला आर्ची या नावानेच ओळखतात.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या