Aarti Singh | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तथा गोविंदाची भाची आरती सिंह ही सध्या आपलं वैवाहिक आयुष्य जगत आहे. नवऱ्यासोबत टी हनीमूनला गेली आहे. अशात तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी आता धुमाकूळ घातला आहे. आरतीने (Aarti Singh) नवऱ्यासोबत लिपलॉक करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच लग्न केले आहे.तिने व्यावसायिक दीपक चौहान याच्यासोबत लग्नगाठ बांधली.त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ मागे व्हायरल झाले होते. अशात ति नवऱ्यासोबत दुसऱ्यांदा हनीमूनला गेली होती. काल रविवारी तिने फ्रेंडशिप डे देखील सेलिब्रेट केला.
गोविंदाची भाची आरती सिंहचे फोटो व्हायरल
आरती सिंह ही सतत पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. अशात तिने या हनीमूनचे फोटो शेअर केले आहेत.आता आरती सिंह हिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
फोटो पोस्ट करताना आरतीने त्याला छानसे कॅप्शन देखील दिले आहे. ‘नेहमी माझा मित्र राहणाऱ्या माझ्या नवऱ्याला हॅप्पी फ्रेंडशिप डे’, असं कॅप्शन आरतीने दिलं आहे. तिने(Aarti Singh) नवऱ्यासाठी एक मोठी पोस्ट देखील लिहिली आहे.
आरती सिंह हिने पतीसोबतचे ‘ते’ फोटो केले शेअर
“तु मला माझं बालपण पुन्हा जगू दिलंस. तुझ्यासोबत असताना मला लहान मुलांसारखं वाटतं. मी तुझ्यावर खूप प्रेम करते.’, अशी पोस्ट आरतीने दीपकसाठी लिहिली आहे. त्यावर दीपकने एक हार्ट इमोजी टाकली आहे. दोघेही या फोटोमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, मध्यंतरी आरती ही प्रेग्नंट आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यावर आरती सिंह (Aarti Singh) किंवा तिच्या नवऱ्याने अधिकृत अशी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सध्या दोघेही एन्जॉय करत आहेत. त्यांचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.
News Title : Aarti Singh romantic photos went viral
महत्वाच्या बातम्या-
“राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे”; प्रकाश आंबेडकरांची थेट मागणी
रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन
रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी बंपर भरती
12 उपक्रमशील शिक्षकांना विनोबा पुरस्कार प्रदान!
केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान