“मातोश्रीचं कीचन माझ्या हातात असं…” आशा मामिडींचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | ठाकरे गटातील उपनेत्या आशा मामिडी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आशा मामिडी या शिंदे गटात गेल्या आहेत. यावेळी त्यांनी पक्षातील महिला नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना सोडण्याचं दु:ख आहे. पण नाईलाज आहे. शिवसेनेच्या उपनेत्या मीना कांबळी या एका बाईमुळे मी पक्ष सोडत आहे. मीना कांबळी ही गद्दार बाई आहे, अशी टीका त्यांनी केलीये.

मातोश्रीचं किचन माझ्या हातात आहे, असं सर्व पदाधिकाऱ्यांना ही बाई बोलत असते. म्हणजे रश्मी वहिनींच्या नावावर ही महिला काय काय करत असेल याचा विचार न केलेला बरा, असं आशा मामिडी यांनी म्हटलं आहे.

मी खूप टेन्शनमध्ये आहे. माझी उद्धव ठाकरेंबद्दल तक्रार नाहीये. रश्मी ठाकरेंबद्दल तक्रार नाहीये. माझं उपनेतेपद डिक्लेअर झाल्यापासून मीना कांबळी यांनी पक्षातील महिलांचं खच्चीकरण करण्यास सुरुवात केली, असं त्या म्हणाल्यात.

मी पक्षात 35 ते 40 वर्ष काम केल्याचं त्या सांगत असतात. तुम्ही एवढं काम केलं तर काय केलं. दक्षिण मुंबईत 75 टक्के महिला घरी बसल्या आहेत. चिरीमिरीचं काम करत असते. कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करत असते, असा आरोप त्यांनी केला.

मला जबाबदारीने पद दिलं होतं. मी खूश होते. मी तिकीट मागायला गेले नव्हते. पद मागायला गेले नव्हते. मी कामाठीपुऱ्यात काम करत होते. महिला माझ्यासोबत काम करायला येत होत्या. तेव्हा त्यांना अडवलं जायचं. पदावरून काढण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-