बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…पण गर्दी जमवणाऱ्या एका गबरुवर कारवाई का नाही?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या महराष्ट्रात सर्वत्र चर्चेत आहे. दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. 15 दिवसांनंतर काल पहिल्यांदा वनमंत्री संजय राठोड हे प्रत्यक्ष मिडीयासमोर आले आणि माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं वक्तव्य केलं. यावेळी राठोडांसोबत हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक उपस्थित होते. यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलारांनी एक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना काळात गर्दी केली म्हणून 10 हजार जणांवर गुन्हे दाखल करु पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही?, एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मा.मुख्यमंत्री बोलणार नाहीत, महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे…तो मी नव्हेचं!, असं म्हणत आशिष शेलारांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमधील अन्य मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

काल संजय राठोड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, या प्रकरणातील आणखी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणातील गबरु नावाचा हा नवीन व्यक्ती कोण आहे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, कोणत्याही चौकशीचा निष्कर्ष येईपर्यंत संबंधित मंत्र्याने आपल्या पदाचा त्याग केला पाहिजे, ही या देशाची परंपरा आहे. कारण एखादा पीआय किंवा एपीआय चौकशी करत असतो तो मंत्रिपदापेक्षा लहान असतो. त्याच्यावर मंत्र्याचा दबाव येऊ शकतो. त्यामुळे अशा आरोपावेळी मंत्र्यांनी पायउतार व्हायला हवं, असं मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

एकनाथ खडसेंना भोसरी जमिन प्रकरणी न्यायालयाचा मोठा दिलासा!

सुप्रसिद्ध PK सिनेमाचा सिक्वेल येणार; आमीरच्या जागी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत!

‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’; ‘या’ भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

बीडमध्ये मंगलाष्टकांऐवजी वंदे मातरम या गीतावर पार पडला विवाह, धनंजय मुंडे म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More