बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरसीबीचा ‘वाघ’ एबी डिव्हिलियर्सचं वादळी शतक, गोलंदाजांना भरणार धडकी, पाहा व्हिडीओ

मुंबई |  2021 वर्षातील आयपीएलच्या उर्वरित सामन्यांची सुरूवात 19 सप्टेंबर पासून युएईमध्ये होत आहे.  त्यासाठी आयपीएलचे संघ सध्या मैदानावर सराव करताना दिसत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ गुणतालिकेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. अशातच आता आरसीबी संघाचा धडाकेबाज फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्सने सराव सामन्यात झंझावत खेळी करत शतकी तडाखा लावला आहे.

आरसीबी संघाचा गोलंदाज हर्षल पटेल आणि सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कलच्या यांच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा सराव सामना झाला. हर्षल पटेल यांच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठरवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए.बी. डिव्हिलियर्सने 104 धावांची वादळी खेळी केली. यात 10 उत्तुंग षटकार तर 7 खणखणीत चौकार ए.बी.ने लगावले. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरीत सामन्याआधी इतर संघाच्या गोलंदाजांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.

हर्षल पटेलच्या संघात भारताचा सलामीवीर के. एस भरतने देखील 95 धावांची खेळी साकारली. याशिवाय मोहम्मद अझरूद्दीनने 43 चेंडूत 66 धावांची खेळी करत संघाला महत्वाचं योगदान दिलं. हर्षल पटेलच्या संघाने हा सामना आपल्या खिशात घातला. तर देवदत्त पडिक्कल याने 21 चेंडूत 36 धावा केल्या. परंतु आपल्या संघाला तो हा सामना जिंकून देण्यात अपयशी ठरला.

दरम्यान, विलगीकरणामुळे या सराव सामन्यात विराट कोहली आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी सहभाग घेतला नाही. आरसीबीने या आयपीएलच्या हंगामात 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यामुळे पुढील सामन्यांत आरसीबी कशा पद्धतीची कामगिरी करणार आहे, त्याच्याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्र एटीएस काय झोपलं होतं का?’; भाजपचा सवाल

“देशात भाजपसोबत स्पर्धा करण्याची क्षमता कोणत्याच पक्षात नाही”

भारताचा कधीही अफगाणिस्तान होणार नाही, हिंदू जगातील सर्वात…’; जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More