बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे ‘भाग्य’ आहे”

मुंबई | आयपीएल 14 च्या प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यामध्ये केकेआरनं आरसीबीवर 4 विकेट्सनं विजय मिळवत आरसीबी संघाचा यंदाचा आयपीएल प्रवास थांबवला. यासोबतच विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या प्रवासालाही पूर्णविराम लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पुन्हा एकदा आयपीएलच्या ट्राॅफीपासून मुकावं लागलं. अशातच आता विराटसोबत आणि त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याविषयी एबी डिव्हिलियर्सनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सामन्यात झालेल्या पराभवानंतरही एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, विराटनं इंडियन प्रीमियर लीगच्या या टीमवर कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकला आहे हे कधीही समजणार नाही. विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास मिळणं हे भाग्य आहे. एबीडीच्या या वक्तव्यानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली.

फ्रँचायझीनं जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये एबीडी म्हणाला की, विराट आरसीबीचा कर्णधार झाल्यापासून बरेच वर्षे झाली मी इथेच आहे. त्यामुळे माझ्या मनात काही येत असेल तर ते म्हणजे मी विराटचा खूप आभारी आहे. त्यानं ज्या प्रकारे या टीमचं नेतृत्व केलं ते सर्वांना प्रेरणा देतंय. एक खेळाडू आणि एक व्यक्ती म्हणून अधिक चांगलं होण्यासाठी मला नक्कीच प्रेरणा मिळाली आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामाचा शेवटचा सामना झाल्यावर विराट खूप भावूक झाल्याचं पहायला मिळालं. विराटसोबत एबीडीही दुःखी असल्याचं दिसत होतं. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटला असं पाहून त्याच्या चाहत्यांनाही अश्रू अनावर होत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

…म्हणून देशात जाणवतोय कोळशाचा तुटवडा, केंद्रानं दिलं उत्तर

‘हे कृत्य राक्षसी’; पुण्यातील घटनेवर अजित पवार संतापले

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More