बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Mr.360 वादाच्या भोवऱ्यात! ‘या’ प्रकरणात आढळला दोषी, कारवाईची शक्यता

जोहान्सबर्ग | क्रिकेट हा खेळ सध्या जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जात आहे. आपल्या देशात तर क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. असं असलं तरी काही देशात वर्णभेदाच्या घटनांनी क्रिकेटला काळीमा फासली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघातील बहूचर्चित वर्णभेदाच्या वादात आता जगविख्यात स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स अडकण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या इतिहासात वर्णभेदाच्या अनेक घटना घडल्या आहेत. 2015 साली भारतीय संघासोबतच्या दौऱ्यावेळी ही घटना प्रकर्षानं समोर आली होती. एबी डिव्हिलियर्सने वर्णभेदाच्या मुद्द्यावर खेळाडूंची निवड होण्यास विरोध केला होता. या प्रकरणी त्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी चर्चादेखील केली होती.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाकडून वर्णभेदाच्या प्रकरणावर आपला अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाण्याची शक्यता आहे. या अहवालात दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रेम स्मिथ, माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाऊचर यांचादेखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच टी-ट्वेंटी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज क्विंटन डी काॅकला या प्रकरणामुळेच एका सामन्याला मुकावं लागलं होतं.

दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अहवालानं मोठा भुकंप होण्याची शक्यता आहे. डिव्हिलियर्स हा क्रिकेटच्या इतिहासातील महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. दक्षिण आफ्रिका मुळातच स्वातंत्र्याच्या अगोदरपासून वर्णभेदाशी लढत आली आहे.

थोडक्यात बातम्या 

विरूष्काला मोठा धक्का! विराट कोहलीपाठोपाठ आता अनुष्कालाही डच्चू

करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचे मंत्री?; अशिष शेलार म्हणतात, ‘CCTV फुटेज तपासा’

गुगलचा कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रोहित पाटलांच्या बघून घेतोच्या भाषेवर अजित पवार म्हणाले…

देशभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणात मोठा ट्विस्ट; इंद्राणी मुखर्जीनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More