बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंबई | देशात आणि राज्यात आपण अनेकवेळा राजकीय नेत्यांना मनमोकळेपणाने आनंद लुटताना पाहतो. त्यातच सोशल मीडियावर सध्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत(MP Sanjay Raut) तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात आयोजित संगीत कार्यक्रमात या दोन नेत्यांनी गाण्यावर ठेका धरला आहे.

संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत सोमवारी विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपुत्र मल्हार यांच्यासोबत पूर्वशी राऊत यांचा विवाह होणार आहे. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये संगीत कार्यक्रमावेळी सुप्रिया सुळे कुटूंबासह उपस्थित होत्या. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी गाण्यावर डान्स केला. हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.

संजय राऊत यांनी मुलीच्या विवाहाचं निमंत्रण राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींना दिलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेऊन संजय राऊत यांनी विवाहाचं निमंत्रण दिलं होतं. तसेच आजच्या संगीत समारंभात शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे यांनी काही गाणी गायली. मुलगी सासरी जाणार असल्याने संजय राऊत यांच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले.

दरम्यान, राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेले संजय राऊत सध्या मुलीचे लाड पुरवण्यात व्यस्त आहेत. मुलगी पूर्वशीला आनंदाने मिठीत घेताना दिसत आहेत. पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या- 

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

मी आताही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्ता नको- नरेंद्र मोदी

“हे महाविकास आघाडी नव्हे तर महाघोटाळा आघाडी सरकार आहे”

भय्यू महाराज प्रकरणी धक्कादायक खुलासा, चॅटपाहून पोलिसांनाही बसला धक्का

“पहाटेच्या शपथविधीचा प्रसंग माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी सल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More