बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोकरी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट कल्पना; केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. कोरोना काळात अनेकांना संकटांचा सामना करावा लागला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बऱ्याच जणांना हालाकीचा सामना करावा लागला. अशातच या काळात नोकरी मिळवण्यासाठी अनेकांनी भन्नाट शक्कल लढवलेली पहायला मिळाली. अशातच नोकरी मिळवण्यासाठी तरुणानं एक अनोखी शक्कल लढवलेली पहायला मिळत आहे.

नोकरी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नाही. अशीच एक घटना सध्या आयर्लंडमधून समोर येत आहे. पदवीधर ख्रिस हर्किन या तरुणानं नोकरी मिळवण्यासाठी शहरात होर्डिंग्स लावलेले पहायला मिळाले. त्याची ही अनोखी कल्पना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

ख्रिस हर्किननं नोकरी मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अनेक ठिकाणी अर्ज भरले मात्र तरीही त्याला नोकरी मिळत नव्हती. एका आठवड्याभरात त्याला तब्बल 300 ठिकाणी नाकारण्यात आलं. या परिस्थितीला कंटाळून त्यानं शेवटी शहरात होर्डिंग्स लावले. त्याच्या या भन्नाट कल्पनेनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, ख्रिसनं हे होर्डिंग्स लावण्यासाठी चक्क 40 हजार रुपये खर्च केला. लावलेल्या होर्डिग्सनं त्याला चांगलीच प्रसिद्धी भेटली. अनेक चॅनेल्सवरही तो झळकला. मात्र अद्याप त्याला कुठलीही नोकरी मिळाली नाही.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?”

‘…त्यालाच तिकीट मिळणार’; राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसै आहेत, पण पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी नाहीत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More