बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रूग्णांसाठी ‘ऑक्सिजन पार्लर’ची भन्नाट कल्पना; वाचा काय आहे प्रकार

तिरुवनंतपुरम | कोरोना महामारीने देशभर थैमान घातलं आहे. तर काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरकता जाणवत आहे. यात आता केरळमध्ये एक भन्नाट कल्पना राबवली जात आहे. मानरकद येथील सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये अशा एका ऑक्सिजन पार्लरची कल्पना राबवण्यात येत आहे. केरळमध्ये अशा प्रकारचा पहिलाच ऑक्सिजन पार्लर नावाचा उपक्रम केला जात आहे.

गृह विलगीकरणात असलेला कोव्हिड रुग्ण आवश्यक असेल तेव्हा नियम पाळून ऑक्सिजन पार्लरमध्ये येऊन ऑक्सिजन पातळी तपासू शकतो. गरज असल्यास तो ऑक्सिजन मिळवू शकतो. या पार्लरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन असून, ते 24 तास रूग्णांना ऑक्सिजन पुरवतं. प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन हे मशीन पुरवू शकतं. हे मशीन आजूबाजूच्या वातावरणातला ऑक्सिजन घेऊन तो 93 टक्के शुद्ध स्वरूपात रुग्णाला देत आहे. त्यामुळे ऑक्सिजन साठा संपल्याचा शक्यता नगण्य आहे.

केरळमध्ये गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. ते रुग्ण आता रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल, तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हाधिकारी एम. अंजना यांनी नुकतंच जिल्हा पोलीस अधीक्षक शिल्पा देविया यांच्या उपस्थितीत मानरकद इथल्या ऑक्सिजन पार्लरचं उद्घाटन केलं आहे.

दरम्यान, ऑक्सिजन पार्लरमध्ये ऑक्सिमीटरच्या सहाय्याने त्यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच रुग्णांना या मशीनचा वापर करू दिला जातो. एका युनिटची किंमत सुमारे 50 हजार रुपये आहे.

थोडक्यात बातम्या-

“9 लाख 17 हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट पैसे जमा केले”

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीचं आनंद महिंद्रांकडून कौतुक, म्हणाले…

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण!

उद्या बहिणीचं लग्न, आज भावाचा दुर्दैवी मृत्यू; इचलकरंजीतील हृदयद्रावक घटना

लस घ्याच! लसीकरणानंतर मृत्यूचं प्रमाण केवळ 0.00005 टक्के

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More