बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता अशाप्रकारे 4000 रुपये मिळवता येणार; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | केंद्रातील प्रत्येक सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी विविध योजना आणत असतं. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी  अशाच काही महत्वकांक्षी योजना मोदी सरकारने देखील आणल्या आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देखील अशाच योजनांपैकी एक आहे. ही योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी बियाने, खते खरेदी करण्याकरिता निधी मिळावा याकरिता राबवली जाते.

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये जमा झाले आहेत. हे हप्ते दोन हजार रुपयांचे असतात. देशात अद्याप देखील असे बरेच शेतकरी आहेत जे या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, त्यांनी नोंदणी न केल्यानं त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. अशा शेतकऱ्यांंना आता केंंद्र सरकार दुसरी आणखी एक संधी देत आहे.

केंद्र सरकारने उरलेल्या शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत संधी दिली आहे. या तारखेपर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकसाथ दोन हप्ते म्हणजेच 4000 रुपये येणार आहेत. तर तिसरा हप्ता जुलैमध्ये देण्यात येणार आहे.

दरम्यान, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 9.5 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. शेतकरी घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन देखील या योजनेसाठी नोंदणी करु शकतात. तसेच पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंंटरवर देखील नोंदणी करु शकतात.

थोडक्यात बातम्या – 

होय, शिवसेना गुंडगिरी करते आम्ही सर्टिफाईड गुंड, सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता तर…

“25 वर्ष सुरू असलेलं दानवाच्या राज्याचे रूपांतर रामराज्यात आपण करू”

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More