Top News देश मनोरंजन

अबब!!! एका चुकीमुळं 50 लाख फॉलोवर्स असलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं नाक झालं विद्रुप!

बीजिंग | प्रत्येक मुलीला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं. त्यासाठी मुली अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करत असतात. पण याच शस्त्रक्रिया कधीकधी त्यांना सुंदर ऐवजी विद्रुप बनवतात. असाच काहीसा प्रकार चीनच्या 50 लाख फॅालोवर्स असलेल्या एका अभिनेत्री सोबत घडला आहे.

चीनची अभिनेत्री गाओ लियू हीला तिच्या एका मित्राने नाक ट्रीम करण्याचा सल्ला दिला होता. मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार गाओ ग्वांगझू येथील एका कॅास्मेटिक सर्जरी क्लिनिक मध्ये नाकाची सर्जरी करण्यासाठी गेली होती.

गाओच्या चार तास चाललेल्या नाकाच्या शस्त्रक्रियेनंतर तिचं नाक सुंदर दिसण्याऐवजी तेथील पेशी मृत होत तेथे सुज आली. त्यामुळे तिचं नाक विद्रुप दिसायला लागलं. सर्जरी चुकल्यामुळे गाओला 4 लाखांचा तर फटका बसलाच त्यासोबत तिला अनेक भूमिकाही गमवाव्या लागल्या आहेत.

दरम्यान, गाओने चीनमध्ये वापरल्या जाणाऱ्या ट्विटरसारख्या वेईबो या सोशल मिडीयावर नाक दाखवणारा स्वत:चा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत गाओनं तिचा अनुभव सांगितला असून चाहत्यांनाही सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

‘नशिबानं थट्टा मांडली’; चेतेश्वर पुजारा झाला एक टप्पा आऊट, पाहा व्हिडीओ

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रमक

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या